अरुण वि.देशपांडे
पुस्तक परिचय -कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह - "काव्यानंद "
पुस्तक परिचय -कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह - "काव्यानंद "
पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
-------------------------------------------------------------------------------
रसिक हो नमस्कार ,
कवितेची आवड असणारे रसिक वाचक आणि कविता लेखनाची आवड असणारे कवी .यांच्या भेटीचा आनंदयोग जुळून आलाय तो फेसबुकवरील सर्वपरिचित समूह "काव्यानंद प्रतिष्ठान "यांच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या उपक्रमामुळे .समूह - संचालक श्री .सुनील खंडेलवाल आणि त्यांचे सहकारी .यांचा कविता-विषयक जिव्हाळा "काव्यानंद संग्रहामुळे पुस्तकरूपाने सिद्ध झालेला आहे.याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
यातील सहभागी कवी इंटरनेट व फेसबुक या माध्यमातून आपापल्या कविता-लेखनाने वाचाकंना परिचित झालेले आहेतच त्यांच्या कविता हाच त्यांचा परिचय आणि त्यांची ओळख आहे असे म्हणूयात.
कविता हणजे मनाची अभिव्यक्ती असते..कवी एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून समाजात वावरतांना अनेक जीवनानुभव घेत असतो त्याचे संवेदनशील कविमन कवितेतून व्यक्त होत असते .जीवन -अनुभवणे किती वेगवेगळ्या पातळीवरचे असते ".हे कवीची कविता सांगत असते ."
याची प्रचीती या संग्रहातील कविता नक्कीच देतात.
काव्यानंद - संग्रहात अनेक कविमित्र आपल्या कवितेतून व्यक्त झालेले आहेत "एका अर्थाने .हे"कवितेचे प्रतिनिधी आहेत ",अनेक भाव-भावनांच्या कविता यात वाचावयास मिळतात .सामाजिक वैचारिक ,प्रेम- वात्सल्य या भावना, ,निसर्ग आणि माणूस "यांच्यातील नाते " अशा विविध विषयावरील कविता आहेत."याशिवाय "आई" हा सर्वप्रिय विषयावर देखील कविता संग्रहातील कवींनी केल्या आहेत .
कवी आशावादी असतो असे म्हणतात .कारण जीवनातील श्रेयस त्याला अपेक्षित असते ..अशा "आशावादी कविता "या संग्रहात आहेत.त्यामुळे .निराशेचा तीव्र असा सूर "या कवितेत आहे असे फारसे जाणवत नाही.
सहभागी कवींच्या सर्वच कविता मी मनापसून वाचल्या ..आणि जाणवले .हे मित्र उत्तम लेख्न-क्षमता असलेले कवी आहेत,हा संग्रह म्हणजे त्यांच्या कवितेचा आणि प्रतिभेचा आरंभिक -अविष्कार आहे..म्हणूनच ..अधिक सराव आणि अभ्यासाने त्यांनी जाणीवेने कवितेने लेखन चालू ठेवल्यास ..त्यांच्या कविता अधिक सकस होण्यास नक्कीच मदत होईल.
सहभागी कवी आणि कवियत्री यांची संख्या लक्षणीय आहे ..त्यासाठी कविता संख्या - असे नियोजन आहे .सर्वच कवी -मित्रांच्या कवितांचा इथे सविस्तर उल्लेख करणे सहज्तेचे नाहीये .
मला भावलेल्या काही कविता अंश देतो आहे ..त्यावरून संगर्हतील कवितांचे आशय-स्वरूप याची कल्पना येऊ शकेल.
१. फुलत्या कळीन न खुडणे
पाळावया हे बंधन आहे
क्रांतीज्योती सावित्रीला ,
हेच खरे तेंव्हा वंदन आहे....(सावित्री....अनिल लांडगे , पृ.३ )..
२.
"निसर्गाचे अनेक अविष्कार आहेत
त्यातील एक अनमोल अनुभूती,कलाकृती
म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीचे सुरेख आकाश ......(पौर्णिमेच्या रात्रीचे आकाश -सौ.अनिता सास्तूरकर ,पृ.८ ),
३- आई असे प्रथम गुरु
तिचे बोट पहिली काठी
तिच्या स्पर्शाने आयुष्य सुरु
प्रत्येक जन्म अपुरा आईच्या सेवेसाठी ...(आई ...संजय पाटील , पृ..२१ )
४."वीज नभातून आज गर्जते
आकाशाचे गूढ गाणे
अमृत होवुनी अवनीवरती
बरसतात नवे तराणे ...(अमृतधारा ..विवेकानंद पोटे, पृ..२२ ),
५."थोरामोठ्यांना नमस्कार
ह्यांच्या हिशेबात नाही बसत
वृद्धाश्रमात त्यांची अडमिशन
करतात मात्र हसत हसत .....(बदल - अशोक कुमावत , पृ- २७ )
६. तुझ असणं नसणं
मजसोबत जोडलेल आहे
कारण तू आणि मी
आता एकच आहे ....(अस्तित्व ..प्रकाश साळवी , पृ- २८ ),
७. तुझ्यामुळेच आई
जगाला माझी जाणीव आहे
रोज मात्र जगतांना
सतत तुझी उणीव आहे ...( आईची माया - सुनील खंडेलवाल , पृ-४५ )
८. "कारण मी विसरते नेहमीच
तू आहेस क्षितीजपल्याड
अन मी तुझ्या आठवा सोबत
एकटीच क्षितिजाअल्याड...(क्षितिजा पल्ल्याड,- राणी कदम , पृ.६३),
९. दर्द जीवाला तूच दिला, साह्ण्याचे बल तूच दिले
दु:खः जरी खोल दरी , पंखी उरी बळ तूच दिले ...(मन माझे तुझ्या स्मरणात ..निसर्ग विश्व , पृ.६६),
१०." मनातल्या मनातही
वसे शब्दांचेच गाव
जसे कोरून राहते
तुझे हृदयात नाव ..( काही शब्द साधे सोपे - ऋचाकर्वे , पृ- ७२ ,)
११. विनंती माझी सर्व मातांना , आठवा आपली आई व बाळपण
जाणून घ्या भावना लेकरांच्या व समजून घ्या त्यांचे कोवळेमन ...(कोवळे मन ..गीता विस्वास केदारे , पृ ७९),
आणि ...
या शिवाय काही कवींच्या कविता शीर्षकाचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
१.-विवेकाचा आनंद जन्माला - मंजिरी पांढारकर , २. लेक वाचवा - सौ.अनघा पतके , ३. ओसाड - कमलेश शिंदे , ४.चामड्याची कुलपं - सुनंदा पाटील
५- वसंत ऋतूत - धनंजय पाटील ,
६ -राधा कृष्ण -प्रियांका कुलकर्णी , ७ -मन- सौ.अनुपमा जाधव ,
८ -पोलीस- कविता शिंदे , ९ -व्यसन - शैलजा वायझडे, ,१० नयनी नभ दाटला - सुनील बिराजदार
११ -आई - निवेदिता गवई, १२ -प्रयत्नांती परमेश्वर - सुनिता महाबळ.
१३ सोबत- सुरज ,१४ विचाररूपी सुंदर फुल -श्रद्धा जोशी.१५ क्षण गहिवरला - भालचंद्र बालटे. १६-पिता- मनीषा भुरके मोकाशी- मनस्वी कविता.
जेष्ठ कवी-संत -चित्रकार .श्री.वि.ग .सातपुते -तथा विगसा (अप्पा )-यांच्या भावकविता या संग्रहाचे आकर्षण आहेत ,,या सर्वांच्या सोबत माझ्या कविता आपल्या अभिप्रायार्थ देता आल्या याचा मला आनंद वाटतो.
शेवटी एक महत्वाचे -
या कवितेची समीक्षा व त्यावरची टीका " यांचे इथे प्रयोजन नाहीये ..पण याचा अर्थ असा नाहीये की. या निकषावर या संग्रहातील कविता पास होतील ", .. स्वतहा कवींनी त्या दृष्टीने विचार करावा
तूर्तास -सर्वांना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक - सुनील खंडेलवाल
काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे
संपर्क - ८८०५०११९७४
मूल्य-रु.१२५/- पृ- ९८
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
**********************************************************************************************************************************
**********************************************************************************************************************************
नमस्कार !
मी सौ. जयमाला वाह ,कल्याण (मुंबई)
काव्यानंद या सुंदर काव्यसंग्रहाबद्दल
माझे मनोगत व्यक्त करीत आहे .




काव्यानंद प्रतिष्ठान पुणे, आपला 'काव्यानंद' हा काव्यसंग्रह अतिशय सुरेख आहे.जीवनाला स्पर्श करतील अशा अनेक विषयांतर्गत कवी वर्गाच्या रचना यामध्ये आहेत.मुखपृष्ठावर नवोदित कवी वर्गाचे एकत्रित कौतुकास्पद दर्शन, मलपृष्ठावर विगसा (आप्पा) चे मार्मिक असे मनोगत.महत्वाचे म्हणजे आपण आपले मलपृष्ठाच्या अंतर बाजूस उद्देश मांडले.या काव्यसंग्रहाला विगसा म्हणजे आप्पांची प्रस्तावना लाभली आहे.आप्पांचे लेखन व अभ्यास किती दिव्य व प्रतिभावान आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही . ते सर्वांना माहित आहे.ते आपले आधारस्तंभ आहेत.त्यांनी प्रस्तावने मध्येच कवी चे मन कसे असते? कविता कशी बनते? कशी असावी? याबाबत अतिशय छान सांगितले आहे.कविता प्रकाशित झाल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी कशी वाढते हे अतिशय सौम्यतेने सांगितले आहे.संपादकिय प्रस्तावनेत मा.अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी ही काव्यसंग्रहाचे मोल , कवींचे योगदान व विषय विविधता स्पष्ट केली.मा.सचिव श्री.विवेकानंद पोटे यांनी ही काव्यसंग्रहाच्या प्रकाशिता वर दृष्टिक्षेप टाकला आहे.
या काव्यसंग्रहात कवींनी विविधतेवर म्हणजे प्रेम, मातृ-पितृ, निसर्ग, जीवन,विरह,समाज, ऋतु, वैचारिक, प्रासंगिक, अशा अनेक विषयांवर लिहिले आहे.कवींचे लेखन कौशल्य सर्वोत्तम आहे.सर्वच कविता सुंदर , अप्रतिम व उल्लेखनीय आहेत.या संग्रहातील मला भावलेल्या कविता म्हणजे,
१) सावित्री- अनिल लांडगे
२) अस्तित्व- प्रकाश सालवी
३) नयनी नभ दाटला-सुनिल बिराजदार
४)घरकुल दोघांचे- गीता केदारे
५)भेटलीस गं तू मज जेव्हा- विगसा
६) देत रहा तू ,देत रहा!- विगसा
अतिशय सुरेख व प्रबोधनिय असा हा काव्यसंग्रह सर्व काव्य रसिकांना व वाचकांना आवडेल असाच आहे.पुढील कार्यास सर्व कवींना लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!
सौ.जयमाला अभय वाघ
कल्याण, ठाणे.
**********************************************************************************************************************************
समीक्षण: कवी/लेखक-धनंजय शंकर पाटील.
काव्यानंद (राज्यस्तरिय प्रातिनिधीक कविता संग्रह) काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे.
महाराष्ट्रभरातील प्रतिभावंताच्या,काव्यानंद देणा-या अप्रतिम रचना: काव्यानंद प्रातिनिधीक कविता संग्रह.
"काव्यानंद" प्रातिनिधीक कविता संग्रह "काव्यानंद प्रतिष्ठान" तर्फे प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्रभरातील नवोदित आणि नामवंत कवी,कवयित्री यांच्या योगदानाने हा काव्यानंदचा सुंदर कविता संग्रह बनलेला आहे. नवप्रतिभेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने "काव्यानंद प्रतिष्ठानची" निर्मिती झाल्याचं काव्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल संपादकीय मध्ये सांगतात.या संग्रहास वि.ग. सातपुते (विगसा) यांची मार्गदर्शनपर मोलाची प्रस्तावना लाभली आहे. तसेच काव्यसंग्रहातील कवित्वावर प्रकाश टाकणारा अभिप्राय जेष्ठ कवी अरूण वि. देशपांडे यांचा मिळालेला आहे.
"काव्यानंद" प्रातिनिधीक कविता संग्रहात महाराष्ट्रभरातील २९ कवी, कवयित्रीचा समावेश असून प्रत्येकी तीन कविता, प्रत्येक कविच्या या संग्रहात आहेत. संग्रहात एकूण ८६ कविता असून,मनाचे वेगवेगळे भाव उलगडणा-या कविता मनोवेधक, सुंदर,संदेश देणा-या आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील कविता, मनाला मोहून टाकतात. काही कविता "सेव्ह गर्ल" चा सामाजिक संदेशही देतात.अश्याच काही रचना,
सावित्री तुझ्या कार्याचं,
नित्यची स्मरण आहे.
आजही तुझ्या लेकीचं,
गर्भातच मरण आहे.
(सावित्री...कवी अनिल लांडगे...पृ.क्र.३)
प्रेम म्हणजे...
वात्सल्य, करूणा, दया,माया.
तर कधी असते,
सुगंधित चंदनाची शीतल छाया.
(प्रेम....सौ. अनिता सास्तुरकर...पृ.क्र.६)
श्वास होतीस तू माझा,
न सांगताच निघून गेलीस.
अखेरचा प्रेमाचा इकरार करायची,
संधीही दिली नाहीस.
(सोबत...सूरज वैद्य...पृ.क्र.१०)
मुक्त झाले तरिही,
भय इथले ना सरले.
सपान आसं मला,
गर्भात पडले.
(स्री-भ्रुण गाणे...कमलेश शिंदे...पृ.क्र.१२)
तुझ्या आठवणीत आई,
अश्रूंना बांध फुटला.
मनाला मायेचा आधार,
हवा-हवासा वाटला.
(तुझ्या आठवणीत...धनंजय शंकर पाटील...पृ.क्र.१५)
फुलपाखरू मी स्वच्छंदी,
उडे मी माझ्या धुंदी.
पहा माझे छोटे पंख,
दिसे कसे रंग-बिरंगी.
(फुलपाखरू...संजय पाटील...पृ.क्र.१९)
वारकरी मी आयुष्याचा,
मनी माऊली साजिरी.
विठू माझा श्वास झाला,
देह झाला पंढरी.
(माऊली...विवेकानंद पोटे...पृ.क्र. २३)
गोतावळा सभोवती,
आपले दुर शोधतो मी.
अरसिकांच्या दुनियेत,
माझे सूर शोधतो मी.
(शोध...अशोक कुमावत...पृ.क्र. २५)
तुझं असणं नसणं,
मजसोबत जोडलेलं आहे.
कारण तू आणि मी,
आता एकच आहे.
(अस्तित्व...प्रकाश साळवी...पृ.क्र.२८)
तुटत्या पतंगासारखे,
अचानक आपले बंधन,
तोडून गेली.
डाव प्रपंचाचा मांडुनी,
अर्ध्यावरती सोडून गेली.
(डाव प्रपंचाचा...कविता शिंदे...पृ.क्र.३१)
मुका जीव जळतो,
रोज भुकेच्या झळेनं.
सांगा कुणा म्होरं मांडाव,
माझं जिवंत मरणं.
(माझ जिवंत मरण...सुनिल बिराजदार...पृ.क्र.३४)
वाक्य मनी हो तुम्ही कोरा,
थांबला तो संपला.
ध्येय जिंकण्या चालू ठेवा,
अखंड लढा आपला.
(प्रयत्नांनी परमेश्वर....सुनिता महाबळ....पृ.क्र. ३९)
भिजल्यात तारका,
अन् का गोठल्या मशाली.
दारात सांझवेळी,
छाया कभिन्न काळी.
(काळोख काळजात....सौ.अनघा पतके....पृ.क्र. ४२)
तुझ्यामुळेच आई,
जगाला माझी जाणीव आहे.
रोज मात्र जगताना,
सतत तुझी उणीव आहे.
(आईची माया....सुनिल खंडेलवाल... पृ.क्र.४५)
जीवनाला संकटाची साथ आहे,
म्हणून सुखाच्या सावलीची आस आहे.
अंगणातल्या तुळशीला,
मंजिरीचा वास आहे.
(साथ आस...मंजिरी पांढारकर....पृ.क्र.४६)
आकाशाचा कागद,
केला सागराची शाई.
आईची थोरवी पूर्ण करायला,
माझ्याकडे शब्द नाही.
(आई...निवेदिता गवई....पृ.क्र.५०)
सदाच खुणावते मजला,
ही जीर्ण वाड्याची भिंत.
एकण्या जावे म्हणते,
केविलवाणी तिची खंत.
(वाडा...शैलजा वायझडे...पृ.क्र.५३)
तुझे शब्द होतात,
माझ्यासाठी फुले.
तुझ्यामुळेच माझे,
गगन होते खुले.
(सखा...सौ.अनुपमा जाधव...पृ.क्र.५८)
जड अंत:करणाने घेतला,
होता तुझा निरोप.
काळीज माझ करतंय,
अजुनही माझ्यावर आरोप.
(चारोळ्या....श्रद्धा जोशी...पृ.क्र.६०)
अनामिक त्या नात्याची,
जीवाला उगी ओढ आहे.
दाहीदिशांना अर्थ सांगणारं,
ते एक नाजुक गाव आहे.
(अनामिक त्याग....राणी कदम....पृ.क्र.६५)
कधी उंचावरून पडशील,
चालतच राहशील.
हिंमतीने घे उभारी,
घे चल गगन भरारी.
(गगन भरारी....निसर्ग विश्व...पृ.क्र. ६७)
तो अवखळ कृष्ण कन्हैया,
ती प्रेमवेडी राधा झाली.
प्रेममय बासरीच्या नादामध्ये,
स्वत:लाच मग विसरून गेली.
(राधा कृष्ण...प्रियंका कुलकर्णी...पृ.क्र.७०)
माझ्या घराच्या अंगणी,
कृष्ण तुळस डोलते.
दीवा लावता सांजेला,
वृंदावन उजळते.
(माझ्या घराच्या अंगणी.... त्ृचा कर्वे...पृ.क्र.७४)
तो कटाक्ष होता,
केवळ माझ्यासाठी.
ती सांज उतरली,
आज नदीच्या काठी.
(कटाक्ष....सुनंदा पाटील...पृ.क्र.७५)
घरकुल दोघांचे,
दोघांच्या जीवाभावाचे.
जपूया त्यात नाते,
प्रीतीचे व सौख्याचे.
(घरकुल दोघांचे...सौ.गीता विश्वास केदारे...पृ.क्र.८०.)
पाऊस आला, पाऊस आला,
सरसर धारांचा बरसला.
सुरेल मोत्यांच्या गाजेत रमला,
सूर सरींचे गझल झाला.
(पाऊस आला, पाऊस आला... मनीषा भुरके मोकाशी@मनस्वी कविता...पृ.क्र.८२)
रोज रातीला चंद्र चांदण्या,
कुरवाळिती किरणांनी त्याला.
गाऊनी गेली किती पाखरे,
क्षण पुन्हा तो नाही फुलला.
(क्षण गहिवरला...भालचंद्र बालटे...पृ.क्र.८४)
आवडते कुणी अचानक मग मनास,
दुसरे काही आठवत, सुचत नाही.
सरती दिवस एकट्याचे ते पुन्हा नाही,
हे प्रेमच असे, प्रेमाशिवाय काही नाही.
(प्रेमाशिवाय काही नाही...अरूण वि. देशपांडे...पृ.क्र.८९)
दे भावशब्द, स्वर लय,ताल सूर,
प्रसवू दे अंतरी, काव्यप्रतिभा माते.
गंफुनी शब्दब्रम्हा त्या, मज गावू दे,
तुझीच गंधित स्तुतिसुमने शारदे माते.
(हे सरस्वती देवी....विगसा....पृ.क्र.९०)
"काव्यानंद" कविता संग्रहात सामाजिक संदेश देणा-या, प्रेम,वात्सल्य यांनी ओतप्रोत काव्यरचना आहेत. शिवाय निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते दर्शविणा-या कविताही आहेत. आईविषयीच्या, तिच्या मायेविषयीची थोरवी प्रकट करणा-या कविताही या संग्रहात आहेत. आशावादी, संदेशात्मक कविताचा वेगवेगळ्या भावभावनांनी ओतप्रोत काव्याविष्कार काव्यानंद कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील सर्वच सहभागी कवी/कवयित्रीच्या कविता सुंदर, संदेशात्मक, भाव भावनांनी ओतप्रोत अश्या आहेत.हा "काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे" तर्फे प्रकाशित कवितासंग्रह वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची शंका नाही. काव्यानंद प्रतिष्ठानने, युवा तसेच नामवंताच्या सोबतीने बनलेला काव्यसंग्रह संग्रहित ठेववा असाच सुंदर आहे. काव्यानंद प्रतिष्ठान तसेच सर्वच कवी/कवयित्री मित्रांना पुढील सुंदर वाटचालीस, लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा !
°°°°
काव्यानंद राज्यस्तरिय प्रातिनिधीक कविता संग्रह
"काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे."
पृष्ठ संख्या- ९८
संग्रह मुल्य- १२५/- रू.
प्रकाशन,
काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे
संपादक सुनिल अशोक खंडेलवाल.
अध्यक्ष,
काव्यांनंद प्रतिष्ठान, पुणे.
मोबाईल क्र. ८८०५०११९७४
°°°
*समीक्षण:*
कवी/लेखक-धनंजय शंकर पाटील.
धर्मगाव रोड, माळी वस्ती,
धनंजय निवास, मंगळवेढा.
ता.मंगळवेढा.जि.सोलापूर.
मोबाईल क्र. ८३८०९१६१५५.
**********************************************************************************************************************************
नमस्कार !
मी सौ. जयमाला वाह ,कल्याण (मुंबई)
काव्यानंद या सुंदर काव्यसंग्रहाबद्दल
माझे मनोगत व्यक्त करीत आहे .
काव्यानंद प्रतिष्ठान पुणे, आपला 'काव्यानंद' हा काव्यसंग्रह अतिशय सुरेख आहे.जीवनाला स्पर्श करतील अशा अनेक विषयांतर्गत कवी वर्गाच्या रचना यामध्ये आहेत.मुखपृष्ठावर नवोदित कवी वर्गाचे एकत्रित कौतुकास्पद दर्शन, मलपृष्ठावर विगसा (आप्पा) चे मार्मिक असे मनोगत.महत्वाचे म्हणजे आपण आपले मलपृष्ठाच्या अंतर बाजूस उद्देश मांडले.या काव्यसंग्रहाला विगसा म्हणजे आप्पांची प्रस्तावना लाभली आहे.आप्पांचे लेखन व अभ्यास किती दिव्य व प्रतिभावान आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही . ते सर्वांना माहित आहे.ते आपले आधारस्तंभ आहेत.त्यांनी प्रस्तावने मध्येच कवी चे मन कसे असते? कविता कशी बनते? कशी असावी? याबाबत अतिशय छान सांगितले आहे.कविता प्रकाशित झाल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी कशी वाढते हे अतिशय सौम्यतेने सांगितले आहे.संपादकिय प्रस्तावनेत मा.अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी ही काव्यसंग्रहाचे मोल , कवींचे योगदान व विषय विविधता स्पष्ट केली.मा.सचिव श्री.विवेकानंद पोटे यांनी ही काव्यसंग्रहाच्या प्रकाशिता वर दृष्टिक्षेप टाकला आहे.
या काव्यसंग्रहात कवींनी विविधतेवर म्हणजे प्रेम, मातृ-पितृ, निसर्ग, जीवन,विरह,समाज, ऋतु, वैचारिक, प्रासंगिक, अशा अनेक विषयांवर लिहिले आहे.कवींचे लेखन कौशल्य सर्वोत्तम आहे.सर्वच कविता सुंदर , अप्रतिम व उल्लेखनीय आहेत.या संग्रहातील मला भावलेल्या कविता म्हणजे,
१) सावित्री- अनिल लांडगे
२) अस्तित्व- प्रकाश सालवी
३) नयनी नभ दाटला-सुनिल बिराजदार
४)घरकुल दोघांचे- गीता केदारे
५)भेटलीस गं तू मज जेव्हा- विगसा
६) देत रहा तू ,देत रहा!- विगसा
अतिशय सुरेख व प्रबोधनिय असा हा काव्यसंग्रह सर्व काव्य रसिकांना व वाचकांना आवडेल असाच आहे.पुढील कार्यास सर्व कवींना लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!
सौ.जयमाला अभय वाघ
कल्याण, ठाणे.
No comments:
Post a Comment