Sunday 30 April 2017

काव्यानंद एक प्रेरणादायी प्रवास

                                      * काव्यानंद एक प्रेरणादायी प्रवास  *                                                          

नमस्कार मित्रहो,


         आज १ मे ,महाराष्ट्र दिन ... आपणास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

       सर्व प्रथम काव्यानंद च्या या ई मंचावर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. वर्षभरापुर्वी एका छोट्या वाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेला काव्यानंद आज जागतिक साहित्य विश्वात पदार्पण करत आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने काव्यानंद ने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले व यशस्वीपणे पार पाडले. सर्वांना सोबत घेवून साहित्य यात्रा करत रहायची हा नेहमीच काव्यानंद चा मानस राहीला आहे. संस्थेची ही वाटचाल आपण सर्वांच्या सहकार्यानेच पुढेही चालू राहील.

      हा ब्लॉग आपणास नक्कीच आवडेल. जगभरातील वाचकांपर्यंत, साहित्यप्रेमींपर्यंत आपण या ब्लॉगद्वारे पोहचणार आहोत. काव्यकट्टा या सदराद्वारे आपल्या निवडक कविता दरमहा ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येतील.
     कवितेची आवड असणारे रसिक आणि कविता लेखनाची आवड असणारे कवी.यांचा सुरेख भेटीगठीचा योग या ब्लॉग द्वारे होणार आहे. वाट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून उपलब्ध असलेले व्यासपीठ आता एक पाऊल पुढे टाकत आहे. आपण सर्व यात सहभागी व्हा.
    जेष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री विगसा आप्पांच मोलाचं मार्गदर्शन नेहमीच आपल्या पाठीशी राहील.
    या ब्लॉगचे रचयिता  काव्यानंद प्रतिष्ठान चे सन्माननीय श्री भरत पाटील, माळीनगर यांचे आपणा  सर्वांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

   माझे सर्व काव्यानंद प्रतिष्ठान चे सहकारी पदाधिकारी व काव्यप्रेमी सभासद यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो व आपले असेच सहकार्य असू द्या ,ही विनंती करतो.


काव्यानंद द्या काव्यानंद घ्या!!


            सुनिल खंडेलवाल, विद्यमान अध्यक्ष, तथा  सर्व विश्वस्त मंडळ


              काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे