कवी संमेलन

मराठी राजभाषा दिन

                  मराठी राजभाषा गौरव दिनाच्या प्रित्यर्थ काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे तर्फे मराठी कवितांचे सम्मेलन दि.26. 02.2017 रोजी दुपारी 4  ते 7 या वेळेत स्काउट गाइड ग्राउन्ड सभागृह, ऊद्यानप्रसाद  कार्यालयाजवळ तिळक रोड पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या काव्यसंम्मेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक डॉ महेंद्र ठाकुरदास यांच्या हस्ते झाले. जेष्ठ साहित्यीक व संत चित्रकार श्री वि ग सातपुते, जेष्ठ कवी श्री अरूण वि देशपांडे व जेष्ठ गझलकार श्री सतीश देवपूरकर हे या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून ऊपस्तित होते. महाराष्ट्रभरातील 32 कवी कवयित्रींनी आपल्या कविता याठिकाणी सादर केल्या. मा डॉ महेंद्र ठाकुरदास यांनी कविता कशी असावी याबाबत सर्व नवकविंना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी कविंचा याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमक्रमाचे सुत्रसंचालन विवेकानंद पोटे यांनी तर प्रास्ताविक सुनिल खंडेलवाल यांनी केले.

काव्यानंद प्रतिष्ठान



No comments:

Post a Comment