बोलक्या प्रतिक्रिया

                                                                  काव्यानंद वर्षपूर्ती

नमस्कार काव्यानंदी कवी कवयित्री

 मित्रहो,

आज एक वर्ष झालं जेव्हा या ग्रुपचा जन्म झाला होता. सुरवातीला कविमित्रांना ग्रुपचे निमंत्रण पाठवून, परवानगी घेवून ग्रुपला सभासद सहभागी केली व नंतर संदर्भातून सदस्यता वाढत गेली.
मनाला अत्यंत आनंद होतो की सर्व जन अलिखित नियमांच पालन करतात व दर्जेदार  स्वलिखित साहित्य
पाठवून ग्रुपला सदैव पल्लवित ठेवतात. रचना आवडली तर लगेचच दाद देतात. यामुळे पोस्ट करणा-या कविचा ऊच्छाह दुनावतो व तो पुन्हा नविन लिखान करत तो कवी नवकविता जन्माला घालतो. विषयाचे बंधन न ठेवता या ठिकाणी काव्यज्योत सतत तेवत असते. ग्रुपवर कुठलेही हेवेदावे न करता फक्त अाणि फक्त सुंदर रचनांचा आनंद दीला जातो घेतला जातो.सर्व वाढदिवस, जयंती, शोकवार्ता व इतर सणवार शुभेच्छा गृहीत धरून काव्यसेवा अविरत चालू असते. ईथे फक्त काव्यानंद दिला जातो काव्यानंद घेतला जातो.
श्रोतेहो,वाट्सअप हे साध्य नसून एक साधन आहे. याचा आपन आपल्या दैनंदिन जीवनात संदेशवाहक म्हणूनच ऊपयोग करून घेवूया. काव्यप्रेमींपर्यंत पोहचायचा प्रयत्न करूया. एका वाट्सअप मेसेज च्या माध्यमातून आपली भेट झाली व पुढे  जाता जाता ही काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे ही संस्था जन्माला आली. काव्यानंद काव्यसंग्रह व मराठी राजभाषा दिनाच्या अवचित्याने झालेले कवीसंमेलन आपन सर्वांच्या सहकार्याने पार पडले. अल्पावधित दर्जेदार साहित्य ग्रुप म्हणून काव्यानंद नावारूपास आला. जेष्ठ साहित्यीक, नवकवि, रसिक, मनस्वी काव्यानंद नदेणारे कवि कवयित्रींची ही काव्यदिंडी अशीच पुढे चालू ठेवूया.घडेल तेवढी साहित्य सेवा करूया.....

पुन्हा एकदा सर्वांना लेखण शुभेच्छा, काव्यशुभेच्छा!!


महाराष्ट्र दिनाच्या ही मनःपूर्वक शुभेच्छा


सर्वांचे मनःपूर्वक आभार!!


स्नेहांकित,

सुनिल खंडेलवाल
काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे

.............................................................................................................................................................


काव्यानंद प्रतिष्ठान पुणे या संस्थेस व सर्व कवीमित्रांना शुभेछ्या ..🌹

लिहित रहा ! लिहित रहा !
विगसा ...💐💐💐💐💐

.................................................................................................................................................................

अभिनंदन सर..

सर्व गृपवासियांना वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ...


काव्यानंद हा एक परिवार आहे...

या परिवारात सोबतीने समृद्ध होतांना खूप आनंद होतोय..
आप्पांसारखे जेष्ठ आपल्या गृपमध्ये आहेत...
अवघ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या कवींना एक आपलं वाटणारे व्यासपीठ...
सुखमय प्रवास...
आमच्या माळीनगरच्या चिमुकल्या कवींनाही आपण तेवढाच मानसन्मान देतात खूप ऊर्जादायी बाब...
काव्यानंदचा प्रवास असाच प्रेरणादायी राहो...

पुनश्च सर्वांना शुभेच्छा ..!

भरत पाटील, माळीनगर.
💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐
.................................................................................................................................................................

💐💐💐💐💐काव्यानंद म्हणजे खरोखर काव्य प्रेमींना निखळ आनंद देणारा झरा आहे.

काव्यानंद च्या माध्यमातून आम्हा सर्वांना एकत्र आणल्या बद्दल सुनीलजींचे कौतुक आणि आभार!
अप्पांचे वेळोवेळी ग्रुप वर मार्गदर्शन लाभते. तसेच सर्व  सभासद अतिशय निखळतेने सहभाग नोंदवून राग,लोभ,हेवेदावे किंवा तस्तम भांडणे ग्रुप पासून लांब ठेवतात.ही या ग्रुप ची जमेची बाजू म्हणता येईल.मी अशा समूहाचा भाग आहे याबद्दल मी खूप समाधानी आहे.

आपल्या या लाडक्या काव्यांदनला असेच यश मिळत राहो आणि आपला सर्वांचा सहवास उत्तोरत्तोर रंगत जावो हीच सदिच्छा!

अमृता जोशी, पुणे
💐💐💐💐💐
...............................................................................................................................................................

सर्व कवी - कवयित्री यांचे काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे हार्दिक अभिनंदन. पदार्पणाच्या वर्षातच संस्थेने काव्यसंग्रह प्रकाशित केला तसेच ग्रुप सदस्य संख्या 116 वर जाऊन पोहोचली आहे. श्री वि ग सातपुते (आप्पा )  सर व श्री अरुणजी देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्यानंदची वर्धिष्णू सुरुवात झाली आहे हे पाहून आनंद वाटतो. सर्व ग्रुप सदस्यांना पुन्हा एकदा वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छा !!!


विवेकानंद पोटे, पुणे

सचिव, काव्यानंद प्रतिष्ठान
..................................................................................................................................................................


______काव्यानंद प्रतिष्ठान_______

              आज "काव्यानंद प्रतिष्ठान" समूहाचा वर्धापनदिन. त्यानिमित्ताने काव्यानंद प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ व समूहातील सर्व कवी-कवयित्रींचे मनःपूर्वक अभिनंदन व काव्यानंदच्या पूढील प्रवासासाठी हार्दिक शुभकामना!!!
             काव्यानंदच्या या समूहात माझी मैत्रिण राधिका जोशी हिच्यामुळे या समूहात माझे पदार्पण झाले. श्री. सुनिल खंडेलवाल सरांच्या "काव्यानंद प्रतिष्ठान" समूहात एकापेक्षा एक अव्वल कविता, चारोळ्या सर्व कवी पोस्ट करीत असतात. सर्व कवीवर्ग एकमेकांच्या रचनेचा आस्वाद घेतात व भरभरून दाद देतात. समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे समूहात "शुभ प्रभात किंवा शुभ रात्री" तसेच व्हॉट्सअप वरील तत्सम मॅसेजच्या पोस्ट कोणीही टाकत नाही. एकंदरीत समूहातील वातावरण अतिशय ज्ञानवर्धक, रचनात्मक व उत्साहपूर्ण असते.
            या समूहात सर्वांना लाभलेला अतिशय महत्वपूर्ण दूवा म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पूणे याचे अध्यक्ष भावकवी "श्री. वि. ग. सातपुते (विगसा) म्हणजेच आपणां सर्वांचे लाडके आप्पा. आप्पा हे सर्वांसाठी उत्तम मार्गदर्शक आहेत. आमचे नशीब थोर म्हणून काव्यानंद प्रतिष्ठान समूहातून आमची नाळ आप्पांबरोबर जोडली गेली व वडिलांप्रमाणेच उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे आप्पा आम्हांस लाभले. "लिहित रहा - लिहित रहा" या शब्दांनी सर्वांना लिखाणासाठी स्फूर्ति देणाऱ्या आप्पांना माझा सादर प्रणाम......____/|\_____
                 या समूहातील सर्व कवी-कवयित्रींवर माता सरस्वतीची कृपा सदोदित राहो तसेच सर्वांचे व्यक्तिगत काव्यसंग्रह प्रकाशित होवो व काव्यानंद प्रतिष्ठान समूहाची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच अंतःकरणापासून सदिच्छा...... 💐💐
शेवटी श्री. सुनिल सरांचे एक वाक्य - काव्यानंद द्या.. काव्यानंद घ्या....
.... सौ. गीता विश्वास केदारे....
काव्यानंद प्रतिष्ठान समूह सदस्या......

................................................................................................................................................................



धन्यवाद विवेकानंद जी मला आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो की काव्यानंद ची प्रगती रोखणे आता कुणालाही शक्य नाही या मागे सुनिलजी तुम्ही सर्वांचे लाडके व आदरणिय विगसा (अप्पा) माननिय अरूणजी देशपांडे सर तसेच आमच्या सारखे सभासद असताना काव्यानंद ची प्रगती होतच राहील यात शंकाच नाही हे सर्व यश सामाईक असले तरी कार्यकारी मंडळाचे यात कौशल्य पणाला लागले आहे या पुढे अशिच प्रगती होवो हिच मनोमन प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा

प्रकाश साळवी, मुंबई
🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹💐💐💐
.............................................................................................................................................................

मित्रहो नमस्कार ,🙏

काव्यानंद प्रतिष्ठान पुणे ,या साहित्यप्रेमी संस्थेतील सर्व सभासदांनी अत्यंत प्रामाणिक पणे आपले योगदान वर्षभर आत्मीयतेने दिले याचा मनस्वी आनंद आहे .ही तपश्चर्या अखंड करावी .. संस्थेचा हीरक महोत्सव व्हावा ही इच्छया मी व्यक्त करतो ..शुभेछ्या ..लिहित रहा ..! लिहित रहा ...!!! विगसा .👍🙏🙏
                 🔷🔴🔶
..............................................................................................................................................................

या आपल्या लाडक्या समुहाचं वर्ष केव्हा पूर्ण झालं हे कळलं देखिल नाही उत्तरोत्तर प्रगती होईल हे वेगळे सांगणे नकोच...अभिष्टचिंतन

अशोक कुमावत, पुणे

*काव्यानंदच्या* पुढील वाटचालीस आधीतर खुप खुप शुभेच्छा आणि या परिवाराचा एक लहानसा सदस्य बनण्याची संधी दिल्याबद्दल या चळवळीशी जुडलेल्या सर्वांचेच खुप खुप आभार...!!


समूहातील सर्वच जेष्ठ सदस्यांच्या अनुभवाचा आणि व्यासंगाचा येणाऱ्या काळत माझ्यासारख्या इतरही नवख्या लेखक कवींना नक्कीच खुप फायदा होईल 😊

अक्षय भिंगारदिवे, नगर
...............................................................................................................................................................

                                              ब्लॉगविषयी प्रतिक्रिया


या ब्लॉगचे रचनाकार, निर्माते श्री भरत पाटील, माळीनगर यांचे आपण सर्वांच्या वतीने व काव्यानंद प्रतिष्ठान परिवारातर्फे मनःपूर्वक धन्यवाद

सुनिल खंडेलवाल, पुणे
💐👍🙏🏻

.............................................................................................................................................................


ब्लॉग पाहिला आत्ताच

खुप सुंदर क्रिएटीव्ह काम केलय.
अभिनंदन सर्वांचे.
अरूण वि देशपांडे, पुणे

.............................................................................................................................................................


___काव्यानंद ई भरारी___


काव्यानंद ई- भरारी

घेतली झेप ब्लॉगवरी
डिजीटल दुनियेत
कवींचा उत्साह भारी....

महाराष्ट्र दिनी

समूह वर्धापनदिनी
कल्पना आगळीवेगळी
काव्यानंद ई भरारी....

साहित्य सरस्वती

प्रसन्न सकळांवरी
उत्तमोत्तम प्रगती
घडो साहित्य दिंडी वारी....

घडविण्या साहित्य प्रेमी

कवी रसिक वाचक जन
काव्यानंदी प्रेरणा चरण
काव्यानंद ई भरारी....

... सौ. गीता विश्वास केदारे.....


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐



 *काव्यानंद परिवारच्या ऑफिशियल ब्लाँगच्या शुभारंभास खूप खूप शुभेच्छा...काव्यानंद नेहमीच नवोदितांसाठी सुंदर, नाविन्यपूर्ण उपक्रम घेवून येत असतो. यात आम्हांला आप्पा अर्थात विगसा सरांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळत असते. शिवाय काव्यानंदचे खंडेलवाल सर, प्रतिष्ठानच्या मान्यवरांचे अभिनंदन...ब्लाँग अतिशय सुंदर आहे...अभिनंदन आणि मनपुर्वक शुभेच्छा !


-शुभेच्छुक

धनंजय शंकर पाटील.
मंगळवेढा. जि.सोलापूर.

..............................................................................................................................................................


अतिशय सुंदर ब्लॉग तयार केला आहे.



तंत्रज्ञान सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐

रत्नाकर जोशी

........................................................................................................................................................


*मा.श्री.भरत पाटील यांचे मनपुर्वक अभिनंदन... अतिशय सुंदर ब्लाँग त्यांनी बनवला आहे.*

धनंजय शंकर पाटील, मंगळवेढा

..............................................................................................................................................................


दिवस रात्र अखंड मेहनत घेऊन एक उंची गाठून आज पायरी वर चढून एक मुकाम गाठला आहे

काव्यानंद प्रतिष्ठान चे तसेच ह्या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐💐💐

ह्या सर्व कार्यात माझा सहभाग राहू शकला नाही  सल राहिली ती इतकीच


असो ह्या पुढील कार्यात नक्कीच सहभागी असेल 😊आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ चे पुनःश्च अभिनंदन

💐💐💐
संजय पाटील, पुणे
.............................................................................................................................................................

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सुनील जी व विश्वस्त मंड़ळ ,

  काव्यानंद प्रतिष्ठानचा ब्लॉग अतिशय सुंदर झाला आहे. प्रस्तावना ग्रुपच्या विचारधारेशी समर्पक लिहीली आहे.

 ' काव्यानंद एक प्रेरणादायी प्रवास ' या शिर्षकाचा साज शोभेल असाच आहे. ब्लॉगचे सर्व उपक्रमांचा टॅबमधून परिचय उत्तम करून दिला आहे.

 काव्यानंद प्रतिष्ठानने अल्पावधीत जी प्रगती व सुरेख संयोजनबध्द उपक्रम केले ती कौतुकास्पद आहे. या ग्रुपची मी ही एक सदस्य आहे याचा मला मनापासून आनंद आहे. कवींना व काव्यरसिकांना सुरेख व्यासपीठ तुम्ही मिळवून दिलेत यासाठी तुमचे आम्ही सर्व सदस्य आभारी आहोत.


 असाच काव्यानंद नेहमी आपल्याला  मिळत राहो व इतरांना आपण देत राहू अशीच माझी सदिच्छा आहे.

जेष्ठ साहित्यिक श्री वि ग सातपुते/ आपले आप्पा व श्री अरूण देशपांडे यांचे अमोल मार्गदर्शन व आर्शीवाद नेहमी ग्रुपला व आम्हाला मिळत राहो हीच त्यांना विनंती आहे.

  काव्यानंदची ही यशाची कमान नेहमी चढती राहो व आनंद वाटत राहो हीच मनीषा !! खूप खूप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!!


आपली स्नेहांकित 

मनीषा भुरके मोकाशी.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
...............................,.............................................................................................................................

No comments:

Post a Comment