काव्यानंद काव्यसंग्रह

काव्यानंद काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा    

  दिनांक 10/12/2016 शनिवार रोजी रमा रमण मंगल कार्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे काव्यानंद प्रतिष्ठान पुणे प्रकाशित "काव्यानंद" या पुस्तकाचा दिमाखदार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. सतिशजी देसाई - अध्यक्ष, पुण्यभूषण फाऊंडेशन पुणे तसेच मा.वि. ग. सातपुते, ज्येष्ठ  साहित्यिक व संत चित्रकार संस्थापक अध्यक्ष - महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 
          मा. श्री. सुनिल खंडेलवाल यांच्या नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या अभिलाषेने काव्यानंद प्रतिष्ठानचा जन्म झाला. व सर्वांना घेऊन काव्यसंग्रह काढण्याची कल्पना उदयास आली. व काव्यानंदच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाने भरपूर मेहनत घेऊन एकोणतीस कवींच्या प्रत्येकी तीन कविता घेऊन हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. 
           या प्रकाशनासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे मा. श्री. ज्ञानेश्वर मोळक - उपायुक्त पुणे म.न.पा. आणि मा. श्री. अरुण देशपांडे - ज्येष्ठ कवीवर्य, पुणे यांचेही मोलाचे मार्गदर्शन सर्व नवोदित कवी-कवयित्रींना लाभले व लेखनातील आपली गती ही अशीच नेहमी आपल्या संसारप्रपंचातून वेळ काढून चालू ठेवावी व लवकरात लवकर स्वतःचा काव्यसंग्रह प्रकाशित करावा अशा शब्दांत सर्वांना  शुभेच्छा  दिल्या. 
विविध विषयावर लिहिलेल्या कविता असलेला का काव्यानंद काव्यसंग्रह आपन सर्वांना नक्कीच आवडेल... 

धन्यवाद..













No comments:

Post a Comment